Friday, May 6, 2011

मी असा...मी तसा...

मी असा...मी तसा...मी कसाही काही असो...
हरेक क्षणांमद्धे मला पण तुच आणि तुच दिसो

सावळे गोमटे ध्यान जे तिश्ठले पंढरीत जैसे
वाट तुझी पाहण्याची युगांची तयारी असो

रात्रीची उसवुन शाल टेंभा पेटवुन उभा मी
की आजतरी या नभात तुझा मुख-चंद्रमा दिसो

राग नाही...खंत नाही...तु ये न ये मर्जी तुझी
वेदनांचे गाणे मला माझे मला लखलाभ असो!

----------------------------------

रात्र जेथे संपली....



रात्र जेथे संपली तो क्षण असा जो गोठला
उदयाची बात कोठे? सुर्यही जरा रेंगाळ्ला

येउ नको स्वप्नांत आता, विकली मी ती केंव्हाच कधी
उगा कशाला स्वप्नात येते? "येते" म्हणुन सांगायला?

पाहीले का ते महामुर अश्रु, वाहते जग पुरात ज्यांच्या?
ते अश्रु माझेच गड्यांनो, मीच हवे का सांगायला?

रात्र अशी..रात्र तशी...काय जाते दोष द्यायला?
तुच होती सर्व रात्री माझ्यासवे भोगायला...

मीही किती वेडा गड्यांनो, भान जगण्याचे विसरलो
कोणि सांगीतले होते मला, जगणे तिच्यातच पहायला?

1 comment:

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...