Sunday, October 16, 2011

सावरकरांचे हिंदुत्व (2)



हिंदु धर्मासमोरील समस्या (९)


सावरकरांचे हिंदुत्व हे धार्मिक व्याख्या करत नसुन हिंदु राष्ट्रीयत्वाबद्दल आहे असा समज त्यांच्या विधानावरुन होतो. असा समज होणे स्वाभाविक आहे. एवढेच नव्हे तर जेंव्हा सावरकर म्हनतात "हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले तीस कोटी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. मनुष्यजातीस ह्या शक्तीस तोंड द्यावे लागेल असा एक दिवस उगवेल. ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत ! - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ९०)" तेंव्हा ते अखिल विश्व हेच एक राष्ट्र असा सिद्धांत स्वीकारत एक महा-मानवतावादी असल्याचा देखावा निर्माण करत एक उदात्त भुमिका घेतांना दिसतात तेंव्हा त्यांच्याबद्दल अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. "वसुधैव कुटुंबकम" वा "हे विश्वची माझे घर..." ही तत्वद्न्यांची विराट द्रुष्टी सावरकरही बालगतात हे पाहुन संतोषही होतो.

पण सावरकरच म्हनतात जर "मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' इतर सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल. जसे माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल की जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन मनुष्यपणा तेवढा जगात मनुष्यमात्रात नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन." - (१९२८ स.सा.वा. ३ : ६४४)
सावरकरांचे हेही विधान व्यापक आणि विश्ववादी असल्याचा आभास निर्माण होतो आणि खरे तर ते माझ्याही "One world One nation" या भुमिकेशी सुसंगतच आहे. पण सावरकरच म्हनतात "काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !" - (१९३५ स.सा.वा. ३ : ५७२) तर याचा अर्थ असा होतो कि सर्वच "त्व" वादी "हिदुत्ववादी" व्हायला हवेत कारण तोच ग्राह्यतम धर्म आहे. आता हिंदु हा धर्म जर सावरकरांच्याच मते नाही, हिंदु म्हणुन ओळखल्या जाणा-या भुप्रदेशातील आणि या प्रदेशाला आपली पुण्यभुमी मानणारे ते हिंदु अशी त्यांचीच व्याख्या आहे तर (विश्वातील) ग्राह्यतम धर्म् हिंदु हाच होय असेही सावरकर ठासुन सांगतात.

हेच सावरकर पुढे म्हनतात कि "बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६९ )

मी पुर्वीच्या लेखांत म्हटले आहेच कि हे हिंदुत्ववादी म्हनजे खरे वैदिकतावादी आणि वैदिक संस्क्रुतीचे गौरवगान करत शब्दछल करत सामान्य हिंदुंची ग्झोर फसवणुक करत असतात. वरील सावरकरांच्याच विधानात "सनातन धर्म", "श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त धर्म" अथवा वैदिक धर्म अशा संद्न्या येतात. श्रुती-स्म्रुती म्हणजे सावरकरांना काय अभिप्रेत आहे हे वेगळे सांगण्यत तसा अर्थ नाही, पण श्रुती म्हणजे वेद तर स्म्रुती म्हनजे मनुस्म्रुत्यादि वर्णव्यवस्थेची महत्ता आणि अपरिहार्यता सिद्ध करणारी धार्मिक महत्ता आहे. "सनातन" धर्माचाच अर्थ मुळी वैदिक धर्म असल्याने सध्या बहुजनवाद्यांत "सनतनी" हा शब्द केवढा बदनाम झाला आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पण सावरकर जेंव्हा शीख, जैन, बुद्ध यांनाही हिंदु म्हनतात वा त्यांना हिंदुत्वाच्या परिघात ओढतात तेंव्हा आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. हा सर्वसमावेशकतावाद वरकरणी कोणालाही आकर्षित करु शकतो. पण वास्तव ते नाही आणि कवि असल्याने अवास्तवता मांडणे हा सावरकरांचा एक मुलधर्म आहे. मुलत: हे तिनही धर्म वैदिक धर्माच्या पुरेपुर विरोधात असुन त्यांचे तत्वद्न्यानही अवैदिक आहे. सनातन धर्मात ते लबाडी अशी करतात कि त्यातच शैवादि मुर्तीपुजक अवैदिक परंपरागत धर्माचाही समावेश करुन टाकतात.

कोणी म्हनेल...काय हरकत आहे? हा एकतावाद अधिक महत्वाचा नव्हे काय? हीच हिंदु धर्माची खरी ओळख नव्हे काय? मला मुर्खांच्या नंदनवनात रहायला आवडत नाही. धर्मच अमान्य करुन कोणी असा मानवतावाद मांडला तर तो स्वीकारणे वेगळे आणि धर्म तर हवा पण मी म्हणेल त्या तत्वांचा स्वीकार करणारा असला दुतोंडीपणा कोणीही स्वीकारु शकत नाही. किंबहुना अशा व्याख्या याच हिंदु धर्माच्या (हिंदुत्वाच्या नव्हे) मार्गातील खरे अदथळे बनुन बसल्या आहेत. र.स्व. संघाच्या अशाच धर्मासंबंधीच्या कोलांटौड्या पुढे आपल्याला पहायच्याच आहेत, पण सावरकरांच्या विचारांची चिकित्सा येथे प्रथम आवश्यक आहे.
हिंदु धर्म म्हनजे नेमके काय आणि त्याच्या प्रगतीत पुर्ण अडथळे का येत आहेत याचे कारण येथे शोधायचे आहे. सावरकरांचे हिंदुत्व हे मुलत: प्रादेशिक व्याख्येवरच कसे भर देते हे आपण आधीच्या प्रकरणात पाहिलेच आहे आणि या प्रकरणात सावरकरांचे हिंदुत्व हे मुलत: खरे वैदिक कसे आहे हे आपण पहात आहोत. त्यांनी व त्यांच्या सांप्रदायिकांनी ही भुमिका मान्य केलेलीच आहे आणि ज्यांना ती अमान्य आहे अशांवर शरसंधान करायला ते सर्वस्वी कसे सज्ज असतात हे आपण पाहिले आहे. म्हनजेच या वैदिक सावरकरवादी सांप्रदायिकांनी स्वत:ला हिंदु म्हनणे सोडुन द्यायला हवे कारण ते हिंदु नाहीत तर वैदिक आहेत. त्यांनी आपला धर्म खुशाल जपावा, त्याबाबत कोणाला वावगे वातायचे काही कारण नाही पण धर्माचाच एक गोंधळ उडवुन देत मेंढराचे कातडे पांघरुन लांडग्यांनी अदआणी, नि:ष्पाप मेंढरांच्या कलपात घुसुन त्यांना हाकलायचे व सावकाश गिळण्याचे पातक थांबवावे एवढेच. प्रादेशिकतेचे नांव घेत वैदिकत्वाचा अंमल बसवण्याचा हा प्रयत्न भारतीय "हिंदु" म्हणवणा-यांनीही का नाकारला याचे विवेचन या उत्तरात आहे.

म्हणजेच हिंदु म्हनजे नेमके काय हा अजुनही कळीचा प्रश्न रहातो. आणि त्या प्रश्नाची सोदवणुक हा या लेखमाकिकेचा उद्देश आहे. सावरकरवादी हिंदुत्व हे कडवे, वैदिकतावादी, श्रुती-स्म्रुती-पुरानवादी कसे आहे हे आपण पाहिले. सावरकरांचा अस्प्रुश्यतेला विरोध कसा होता, त्यांनी अस्प्रुश्यांसांठी स्वतंत्र पतितपावन मंदिर कसे उभारले, स्वातंत्र्योत्तर काळात अस्प्रुश्यताविरोधातील कायदा आल्यावर कसे स्वागत केले हे आम्हाला सावरकरवादी हिरिरेने सांगत असतात...आणि आम्हाला सावरकर द्वेष्टे ठरवत त्यांची व हिंदुत्वाची चिकित्सा करणे कसे महत्पाप आहे हे दरडावत सांगत असतात. त्यांना मला हेच सांगायचे आहे कि तुमच्या व्याखेनुसार मी महत्पापी असेल, परंतु मी ख-या हिंदुंसाठी एक चेतनादायी कार्य करत आहे. त्यांची जाग्रुती हे माझे स्वप्न आहे...तुमच्या द्वेषाला मी काडीएवढीही किंमत देत नाही.

थोडक्यात हिंदु हा धर्म कसा याची कसलीही (प्रादेशिक वगळता) सावरकर व्याख्या करत नाहीत पण वैदिकतावाद आणि मनुवाद हाच हिंदुत्वाचा कसा पाया आहे हे ते ठसवतात. हरकत नाही. पण हिंदु धर्म त्याच्याही पार आहे. तो सर्वांच्या आचरणात आहे पण त्यावरची पुटे मात्र खरवडुन काढावी लागणार आहेत. पुढील लेखात आपण रा.स्व.वादी अर्थात गोळवलकरगुरुजीवादी हिंदुत्वावर चर्चा करत वेदांकडे पुन्हा वळुयात.

8 comments:

  1. I think you get paid to write on such things and this is the fault of your (mis)education.
    Please do not consider yourself intelligent enough to analyze the Hindu Dharma and stop wasting internet space.

    ReplyDelete
  2. Thanks Pranav for your kind guidance. I dont see I am inteligent enough...to write on Hinduism...or analyze it for that matter...But at least I dont think Savarkar too was intelligent enough to write on Hinduism or Dharma.


    This following statement of your shows wht we the people need to search our own roots...it is full of egotism and false pride.

    "I think you get paid to write on such things and this is the fault of your (mis)education."

    More is coming up in this series of articles. Want to argue? use your intellect, if it doeas exist at all.

    However Thanks for commenting (and wating more space than I would have...)

    ReplyDelete
  3. वैदिक धर्मावर खरोखरीच मंथन व्हायला हवे... व स्वताहस वैदिक म्हानावून घेण्यात काहीच संकोचा ही नसावा.. आपाले बहुतेक धर्मं ग्रन्थ हे सध्या शुदा स्वरूपात नसून त्यात खुप से इतरांनी घुसदालेले आहे
    अल्लोपनिषद हे त्याचे उत्तम उदहारण महानता येइल. धर्मा वरील विश्वास उड़वा या हेतूने औरंगजेब च्या कालात ह्या उपनिशादाची निर्मिती झाली असे माहितगार लोक सांगतात.
    २ रे म्हणजे आपले वेद, पुराण हे कही फालतू गोष्टी आहेत असे नवे.. रिग्वेदाचा आधार घेऊन कोणी तलपडे नामक माणसाने मुंबई चौपाटी वर विमान उडवले होते त्याची सखोल माहिती राजीव दीक्षित यांच्या ब्लॉग वर मिळेल.

    ३. मंथन गरजेचे आहे.. अनावश्यक गोष्टी काढून योग्य ते ठेवले म्हणजे धर्माला नक्कीच पुनरुज्जीवन मिळेल. मी चतुर्वनाच्या विरोधात नाहिये. पण तो कुठल्या पद्धतीने अमलात अनावा याबाबत संशोधन होने गरजेचे आहे.. आणि कुणीही चतुर्वर्नाच्या विरोधात असावे असे मला ही वाटत नाही.. अता इथे मला वेगला अर्थ अभिप्रेत आहे.. बहुजन चलावालित ज्या प्रकारे हा शब्द वापरला जातो त्या स्वरूपात मी तो वापरत नाहिये. समजुन घयल ही अपेक्षा..
    ४. एखाद्या समाजातील घटकांना केवल ते ठराविक जैतिचे होते म्हणून दूषण देने योग्य नवे.. जसे संत रामदास, स्वातंत्र्यवीर सावरकर, तिलक, अगरकर इत्यादि, असेच चालत राहिले तर मला खत्री आहे की हे लोक झाशी च्या रानीला देखिल सोडणार नाहित. कृपा करून हां पोरखेळ थामबवान्य साठी प्रयत्न करा.. प्रत्येकाला आपले कर्म घडवते जात नाही.. अणि जर कुना तोंडून चुकून काही निघाले असेल तर त्याचा बाऊ करू नाका.. सावरकांचे इतर कार्य ही लक्षात घ्या.. त्यांनी ही जाती भेद मितावान्या साठी कार्य केले आहे.. उत्तमोत्तम कविता लिहिल्या आहेत. लेखन केले आहे.. मग जे चांगले ते घ्यायचे सोडून नको तय गोष्टींचा कशाला एवढा अता पिटा.. अता कही ते स्वतः खाली येऊं सांगू शकणार नाहीत की मी असे कुठल्या अनुशंगाने बोललो. वगैरे वगैरे. सलोखा निर्माण करायची खरी गरज आज आहे.. आपल्या पुढील संकटे आपण जाणताच असाल.. त्या बाबत चर्चा करा.. अणि राहिला सवाल धर्माचा तर वैदिक संस्कृति इतकी जुनी आहे की तय बाबत फारसे कही खत्री लायक सांगाने शाक्य देखिल होणार नाही. अणि मग कुना पशात्याच्या थेओरी आधारे त्याचे विवेचन होत राहील. ज्यातून फ़क्त एकाच सिद्ध होइल की वैदिक धर्मं हे थोतांड होते..
    राजीव दिक्षितंचा ब्लॉग ला जरूर भेट दया.. त्यांचे lectures आइका.. कदाचित तुम्हालाही पुढच्या लिखना साठी उपयुक्त थारू शकेल. मी काही ध्न्यानी नाही पण एक मात्र कलते की भेदा भेद संपवायचे असतील तर ते वेगळ्या मार्गाने ही सम्पवाता येतील तय साठी एखादी जात सम्पवान्याची काहीही गरज नाही..

    ReplyDelete
  4. सावरकरांनी हिंदुधर्मास इतर धर्मांच्या तुलनेत ग्राह्यतम म्हट्ले आहे.त्यांना हवा असलेला धर्म श्रुतिस्मृतिपुराणोक्त नसून विद्न्यान निष्ठ आहे.दोन शब्दांत दोन संस्कृती या आपल्या निबंधात त्यांनी श्रुतिस्मृतीपुराणोक्त ची खिल्ली उडवली आहे.सर्व धर्मग्रंथ कालबाह्य झाले आहेत असे त्यांनी कित्येक वेळा ओरडून सांगितले आहे.हे आपल्या वाचनात आलेले नाही काय?

    ReplyDelete
  5. धर्मग्रंथावर श्रद्धा ठेवणार्यांबाबत सावरकरांचे विचार पहा-- आपल्या धर्मग्रंथातच ही अशी खिचडी झालेली नसून जगातील इतर झाडून सार्‍या अपौरुषेय म्हणविणार्‍या प्राचीन आणि अर्वाचीन धर्मग्रंथांचीही तीच स्थिति आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या मोसेस पैगंबरापासून तो अगदी आजकालच्या अमेरिकेतील मोहंमद पैगंबरापर्यंत सर्वांनी, मनुष्याच्या उठण्याबसण्यापसून, दाढी-मिशा-शेंडीच्या लांबीरुंदीपासून, वारसांच्या, दत्तकांच्या लग्नाच्या निर्बंधापासून तो देवाच्या स्वरूपापर्यंत आपल्या सार्‍या विधानांवर "एष धर्मस्सनातन:' हीच राजमद्रा आणि तीही देवांच्या नावाने ठोकलेली आहे! हे सारे विधिनिषेध देवाने सार्‍या मानवांसाठी अपरिवर्तनीय धर्म म्हणून सांगितले आहेत! सर्व मानवांनी सुंता केलीच पाहिजे हाही सनातन धर्म आणि त्रैवर्णिकांनी तसे भलतेसलते काहीएक न करता मुंजच करावी हाही सनातन धर्मच! लाक्षणिक अर्थीच नव्हे तर अक्षरश: ह्या सार्‍या अपौरुषय, ईश्वरी धर्मग्रंथात एकाचे तोंड पूर्वेस तर एकाचे पश्चिमेस वळलेले आहे! आणि तेही अगदी प्रार्थनेच्या पहिल्या पावलीच! सकाळीच पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना करणे हाही सनातन धर्म आणि सकाळी देखील प्रार्थना म्हटली की ती पश्चिमेकडेच तोंड करून केली पाहिजे हाही मनुष्यमात्राचा सनातन धर्मच! एकाच देवाने मनूला ती पहिली आज्ञा दिली अन् महंमदाला ही दुसरी दिली! देवाची अगाध लीला; राखून दुरून मौज पहात बसण्याचा आरोप शौकतअल्लीवर उगीच करण्यात येतो. हा खेळ चालू करण्याचा पहिला मान त्यांचा नसून असे अगदी परस्परविरुद्ध प्रकार अपरिवर्तनीय सनातन धर्म म्हणून त्या दोघांसही सांगून त्यांची झूंज लावून देणार्‍या गमती स्वभावाच्या देवाचाच तो मान आहे! ही मूळची त्याची लीला ! आणि त्याची नसेल तर त्याच्या नावावर हे ग्रंथ चापून लादून देणार्‍या मनुष्याच्या मूर्ख श्रद्धेची![www.savarkar.org]

    ReplyDelete
  6. सावरकरांचे हेही विधान व्यापक आणि विश्ववादी असल्याचा आभास निर्माण होतो आणि खरे तर ते माझ्याही "One world One nation" या भुमिकेशी सुसंगतच आहे. पण सावरकरच म्हनतात "काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !" - (१९३५ स.सा.वा. ३ : ५७२) तर याचा अर्थ असा होतो कि सर्वच "त्व" वादी "हिदुत्ववादी" व्हायला हवेत कारण तोच ग्राह्यतम धर्म आहे----सर,तुम्ही जो संदर्भ दिलेला आहे तो लेख निर्भीड मध्ये ३/११/१९३५मध्ये बाबासाहेब मुस्लीम होणार अशी आवई उठली होती त्यावेळेस लिहिलेला आहे.सावरकरांची विश्व धर्माची संकल्पना तुमच्या संकल्पनेशी सुसंगतच आहे. इतर त्वे हिंदुत्वात विलीन व्हावीत असे त्यांनी कधीच म्हटलेले नाही.वरील लेख केवळ राष्ट्रबाह्य धर्मोद्गम असलेला धर्म निवडल्यानंतर होणारी राष्ट्रहानी वाचवण्यासाठी लिहिलेला आहे.इस्लामत्व हिंदुत्वात विलीन होवून विश्वधर्म तयार व्हावा असे सावरकरांना वाटत असल्याचे तुमचे मत पटण्या सारखे नाही.सावरकरांचे हिंदुत्व हे प्रादेशिक आणि राष्ट्रीय भावनांपुरतेच मर्यादित असून विश्वधर्माच्या संकल्पनेत त्यांना हिंदुत्व आणि इस्लामत्व या दोहोंचा लोप अपेक्शित आहे.ते मनुवादी कधीच नव्हते.

    ReplyDelete
  7. सावरकरांच्या लेखांचे नुसते मथळे वाचले तरी ते मनुवादी नव्हते हे लख्षात येते-म्हण शिवेन,स्वीकारीन,जो दर्शनाने बाटतो तो देवच कसला,जन्मजात जातिभेद मोडावयाचा म्हणजे काय करावयाचे?,गांधीजी आणि दुधखुळे हिंदु,गाय-एक उपयुक्त पशु,माता नव्हे-देवता तर नव्हेच नव्हे,हा गाभारा की गोठा?,पोथीनिष्ठेची बाधा,घटस्फोट-स्वातंत्र्याचा प्रयोग,गाय-हानिकारक धर्मभावना,धर्मभोळेपणाचा कळस,मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव,खरा सनातन धर्म कोणता,यद्न्याची कुळकथा,गोपालन हवे,गोपूजन नव्हे,सनातन धर्म म्हणजे जातिभेद नव्हे,पोथीजात जातिभेदोछ्क सामाजिक क्रांतिघोषणा..

    ReplyDelete
  8. पण सावरकरच म्हनतात "काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !" - (१९३५ स.सा.वा. ३ : ५७२) तर याचा अर्थ असा होतो कि सर्वच "त्व" वादी "हिदुत्ववादी" व्हायला हवेत कारण तोच ग्राह्यतम धर्म आहे. ----सावरकरांचे आपण वर दिलेलेले वाक्य धर्मांतराच्या चर्चे संदर्भात आलेले आहे.्त्याचा तुम्ही काढलेला अन्वयार्थ सावरकरांना मुळीच अभिप्रेत नाही.तुम्ही धर्मांतराविष्यी लिहिलेल्या वाक्याचा संदर्भ सावरकरांच्या अंतिम ध्येयाशी जोडत आहात.उपरोक्त लेख सावरकरांनी३/११/१९३५ साली बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेनंतर लिहिलेला आहे.त्यावेळेस बाबासाहेब मुस्लीम होणार अशी चर्चा होती.मुस्लीम आणि ख्रिस्ती यांच्या तुलनेत हिंदू धर्म ग्राह्यतम आहे असे सावरकरांनी म्हटले आहे ते त्या धर्मांतरामुळे राष्ट्रहानी होईल असे सावरकरांना वाटत होते म्हणून.बाबासाहेबांनीही हा धोका ओळखला आणि सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसणार्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला.जेव्हा सावरकर विश्व मानवता धर्माविषयी बोलतात तेव्हा इतर त्वे हिंदुत्वात विलीन व्हावीत असे कुठेही म्हटलेले नाही.कृपया लेखांचे संदर्भ नीट ध्यानात घ्या.सावरकर आयुष्यात केव्हाही मनुवादाचे किंवा श्रुतिस्मृतीचे पुरस्कर्ते नव्हते.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...