Sunday, June 10, 2012

मी इश्वर आहे!


हा लेख केवळ एक सांगायचे म्हणुन. एका मित्राने माझ्या एका लेखावर प्रतिक्रिया देतांना विचारले कि "तुम्ही "God" वर विश्वास ठेवता का?" तेही एका शब्दात...हो अथवा नाही. मी नाही असे लिहिले. ते खरेच आहे. या यच्चयावत विश्वात मनुष्यावर पुजा-प्राथना-यद्न्यादि कर्मकांडाने संतुष्ट होईल आणि तुमच्याबाबत दयाळु अथवा शापाळु देव/परमेश्वर मुळात कधी अस्तित्वातच असु शकत नाही. हे मी माझ्या ब्रह्मसुत्र रहस्य या ग्रंथात अधिक स्पष्ट केले असले तरी त्याबाबत येथे थोडेसे.

मी जेंव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवत असतो तेंव्हा तो केवळ आणि केवळ माझ्यावर विश्वास ठेवत असतो कारण मीच परमेश्वर आहे. मीच देव आहे.

माझ्याबाहेर कोणीतरी देव आहे आणि तो माझ्यावर सत्ता चालवतो, आपल्या इच्छेनुसार माझे जीवन घडवतो हे मला मुळीच मान्य नाही. मुळात असा इश्वर अस्तित्वातच असु शकत नाही ही माझी खात्री आहे. मी का मी आहे आणि मी तसा का नाही हे फालतु प्रश्न मला कधीच पडत नाहीत कारण मी एक वैश्विक अपघातातुन निर्माण झालेली व्यक्ती आहे. त्यामागे कोणाचे काही नियोजन वा पुर्वप्रयोजन होते असे मानत नाही कारण मुळात ते वास्तव नाही.

मी कोणताही धर्म मानत नाही. धर्म हे मानवाला गुलाम करण्याचे पुरातन साधन आहे. मी सर्वच धर्मांची चिकित्सा करतो ते त्यांची मानवी जीवनातील वास्तव स्थाने दर्शवण्यासाठी. वस्तुत: तत्वद्न्यान नाही तोच धर्म असतो आणि ज्यालाही तत्वद्न्यान आहे ते धर्म नसुन गुलामीच्या बेड्या आहेत असेच मी मानतो.

मी आहे म्हणुन हे विश्व आहे. मी नसेल तेंव्हा हे विश्व अस्तित्वात असणार नाही. मी एक भ्रम आहे म्हणुनच हे विश्वही एक भ्रम आहे. हे विश्व आणि मी एकच असुन मी आहे म्हणुन विश्व आहे यावर माझा विश्वास आहे. विश्वाने मला निर्माण केले नसुन मीच माझ्यासाठी हे विश्व निर्माण केले असल्याने परमेश्वर मीच आहे.

प्रत्येक जीवमात्र ते जडवस्तुंसाठी हेच अंतिम सत्य आहे. कारण त्या जडवस्तुही मीच आहे आणि सजीवही मीच आहे.

काळ हा पुढुन मागे येतो आणि आम्ही मागुन पुढे जातो. तेंव्हा भुतकाळ हा फक्त भावनीक-मानसीक असुन काळ ही राशी अंतर्विरोधाने भरलेली आहे. काळाचे अस्तित्व आहे म्हणुन आम्हाला जीवंत असल्याचा आभास मिळतो...पण आम्ही जीवंत आहोत असे मुळात कशावरुन? काळ ही राशी वजा केली तर आम्ही जीवंत नसुन फक्त आभास आहोत एवढेच सत्य प्रतीत होते.

पण आम्ही जीवंत आहोत अशा भासात का होईना आम्ही आहोत तर मग तो भासमय काळही आम्हीच आहोत आणि आम्हीच महांकालेश्वर आहोत.

मी महांकालेश्वर आहे कारण माझा माझ्या परिप्रेक्षातील काळ मीच आहे. तुम्ही तुमच्याच काळाच्या सीमेत आहात. तुम्ही तुमचे इश्वर आहात तर मी माझा इश्वर आहे.

काळ पुढुन मागे येतो कि मागुन पुढे जातो याची चर्चा कशाला?

कारण त्याचे अस्तित्वच मुळात भासात्मक आहे.

तेंव्हा मीही भासात्मक आहे...तुम्हीही भासात्मक आहात...आणि इश्वर हाही एक भास आहे.

मी इश्वर आहे.

4 comments:

  1. Actually sir, there are various opinions about the existence of god in the whole world and it's everyone's private issue that to keep the faith on god or not.There are several atheist groups are working on the concept and the truth about god and it is widely distributed from west to east.Famous physicist and author Brethean Russel wrote the book on 'Religion and Science' which is very famous and truly help us to explain us the obstacles between religion and science.

    ReplyDelete
  2. बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या जवळ जाणारे वाटते. त्यामध्ये पण जे काही चमत्कार आले आहेत ते बुद्धाच्या पास्श्यात ५०० वर्षांनी घुसवलेले आहेत. जातक कथा हि त्या कालात्ल्याच. बुद्ध धर्म मध्ये पुंर्जन्म्ला स्थान आहे कि नाही, देव ( प्रचलित वेख्येनुसार) आहे कि ह्या बद्दल वाद विवाद आहे......पण सुखी जगण्यासाठी पाच तत्वे सांगणारा बुद्ध देव आहे आणि त्याची पूजा करा असे सांगणे अशक्य आहे.....त्यामुळे गौतम बुद्धांनी देवाचे अस्तित्व नाकारलेच म्हणावे लागेल. आणि एकदा देव नाही म्हटले कि आत्मा नाही, स्वर्ग नाही , त्यामुळे पुनर्जन्म नाही. आज स्टेफन हव्किंग आपल्या (grand design) पुस्तकात जे म्हणत आहेत मला वाटते ते भारतात फार पूर्वी गौतम बुद्धांनी , चार्वाकानी सांगितले आहे. पण दुर्दैवाने हे आपण सामान्य लोकांना समजावून सांगू शकत नाही................साम्मान्य म्हणजे त्या मध्ये अति शिख्सित उच्च शिक्षित पण आलेच.

    ReplyDelete
  3. काथ्याकुट सोडा .... विचार ... पहा ... विचार पहा... फक्त पहा ... झ्होपेत जागे राहायचा प्रयत्न करा... जागे राहू नका ... झ्होपा .. पण बघा .... पहा ... साक्षी .... काथ्याकुट सोडा...

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...