Friday, August 10, 2012

स्वातंत्र्याबद्दल...



१. सभोवतालच्या विचारव्युहांनी जेंव्हा आपले स्वत:चे विचार प्रभावित होवू लागतात तेंव्हाच आपण स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हरवून बसलो असतो.

२. मनुष्य स्वत:च्या विचारांसह पुढे जाणार कि अन्यांच्या वैचारिक वादळांबरोबर इतस्तत: भरकटत जाणार हे त्याच्या नैसर्गिक नैतीक धारणांवर अवलंबुन असते.

३. व्यक्तिगत धारणा म्हणजे समाज-धारणा नव्हेत तसेच समाजाच्या धारणा म्हणजेच व्यक्तिच्या धारणा नव्हेत.

४. व्यक्तीचे स्वातंत्र्य हे समाज स्वातंत्र्याएवढेच मुल्यवान असल्याने झूंडीच्या विचारसंकल्पना लादणारे गट हे नेहमीच समाज व व्यक्तीस्वातंत्र्याचे शत्रु असतात.

५. सामाजिक विचारस्वातंत्र्य हे नेहमीच सर्व व्यक्तिंच्या व्यक्तिगत विचारस्वातंत्र्याचा एकुणातील समुच्चय असतो...तर झुंडीचे स्वातंत्र्य हे परतंत्र प्रवृत्तीच्या पराभुत व्यक्तिंच्या नैराश्याचा एकुणातील आशय असते.

६. वैचारिक प्रभाव आपसुक निसर्गत: पडणे आणि प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे यात म्हणुनच मुलत: फरक असतो.

७. निसर्गत: स्वतंत्र वृत्तीचा मनुष्य आपल्या स्वभावधर्माला अनुकुल अशाच विचारांना स्वीकारत जातो वा नवीन विचारांना विकसीत करत जातो, पण परतंत्र वृत्ती नेहमीच गतानुगतीक होत नेहमीच पुरातनाचा आधार घेत हिंसक मृत-वैचारिक झुंडी बनवण्यात अग्रेसर असतात. अशाच झुंडींनी आजवर मानवी आत्म-विकासाचा स्वतंत्र मार्ग डागाळुन व अवरुद्ध करुन ठेवला आहे.

८. विश्वात काहीही पवित्र नाही कि काहीही अपवित्र नाही, पण अमुकच पवित्र वा अमुकच अपवित्र असे द्वंद्व निर्माण केले जाते तेंव्हा मानवी स्वातंत्र्य संकोचु लागते.

९. वैचारिक पारतंत्र्य हवेसे वाटणे वा लादुन घेणे ही मानसिक विकृती आहे...मानवी स्वातंत्र्याच्या मुलभुत नैसर्गिक संकल्पनेशी विरोधाभासी आहे म्हणुनच ती त्याज्ज्य आहे.

१०. परतंत्र वृत्तीचे लोकच परतंत्र झुंडी निर्माण करत असतात. स्वतंत्र मनोवृत्तीचे लोक कधीही झुंड बनवत नसतात.

११. स्वातंत्र्य-पारतंत्र्य हे बाह्य नसते...ते राजकीय, आर्थिक नसते...तर स्वयंप्रेरणाधिष्ठ असते. ते आंतरिक असते. एक वेळ आर्थिक/राजकीय गुलाम जे स्वातंत्र्य भोगु शकतो ते कदाचित मालकांनाही भोगायला मिळत नाही, ते यामुळेच!

१२. जर कोणी पारतंत्र्यात असेल तर तो परतंत्र लोकांमुळेच...स्वतंत्र मनुष्य कधी कोणाला परतंत्रात नेत नाही किंवा जात नाही. आणि असे स्वतंत्र लोक हेच वैश्विक स्वातंत्र्याचे खरे अधिष्ठाते असतात.


10 comments:

  1. नमस्कार संजय सर,

    मी संगणक अभियंता असून, आपल्या "ब्लॉग" चा नियमित वाचक व चाहता आहे. लेखकाची वैचारिक अभिव्यक्ती स्वतंत्र असली तरी, वाचक मात्र नेहमी कुठल्या दुसर्या लिखाणाशी तुलना करून, त्याला एका 'लेबल' खाली आणायचा प्रयत्न करतो. किंबहुना त्याला त्याशिवाय आपण लिखाण समजून घेतले आहे असे वाटतच नाही. हा प्रयत्न प्रत्येक लेखकाला रुचातोच असे नाही. कारण दुसर्याशी आणि त्यातल्या त्यात गत लेखकाच्या लिखाणाशी तुलना ही गोष्ट सदर लिखाण वैयक्तिक विचार मंथनातून आले आहे ह्यालाच कळत-नकळत धक्का लावते. तथापि असा कुठलाही हेतू मनामध्ये नाही असे नमूद करून, धाडस करून मला असे म्हणावेसे वाटते जे. कृष्णमूर्ती ह्या प्रख्यात विचारवंतांच्या आणि आपल्या लिखाणाची अभिव्यक्ती स्वतंत्र असली तरी मूळ मुद्द्यामध्ये साधर्म्य वाटते.

    व्यक्तीशः , मनुष्य स्वतःची ओळख कशात शोधतो, हा मला कळीचा मुद्दा वाटतो. स्वतःचा भूतकाळ ओळख देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो. पण भूत आणि वर्तमानात इतरांच्या तुलनेत फार स्पृहणीय, अभिमानास्पद नसेल तर मात्र, तसा तो बनवून देणाऱ्या आश्वासनांचे बाजार मांडणाऱ्या व्यक्ती, संघटना ह्यांच्या आहारी जाणे फार सोपे असते. विचारमंथन करून स्वतः ओळख म्हणजे काय ते ठरविणे (समाजाच्या संकल्पनांनी प्रभावित न होता) व त्या साठी मार्ग शोधून मार्गक्रमणा करणे ह्या एक प्रकारच्या प्रसववेदना सोसायची मनुष्याची तयारी नसते. त्या पेक्षा "अहो 'क्ष' (कुठल्याही महापुरुषाचे नाव टाका) काय मोठे होते, आणि 'क्ष' ह्यांचा मार्ग आम्हाला समाजाला आहे आणि त्यावरून चाललात तर आयुष्याचे कल्याण नक्की आहे." अशा हाका देणार्यांमागे मेंढर होऊन जाण ही खूप सोपी पळवाट आहे. आणि ह्याच पळवाटांना "व्यक्ती-निष्ठ", "विचार-निष्ठ" अशा भारदस्त संज्ञा देऊन त्या पळवाटांचे समर्थन केले जाते, नव्हे त्याला समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जाते. मग प्रसव-वेदना सोसायचा आणि मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा गमावून, "एकला चलो रे", हा खडतर मार्ग कोण अवलंबिणार ? ज्याला दोन वेळचे जेवायला मिळत नाही, ज्याच्या डोक्यावर छत्र नाही आणि अंगावर वस्त्र अशा मनुष्याकडून ह्या वैचारिक शोधाची अपेक्षा सुद्धा करणे सुद्धा चूक वाटते. त्या मुळे दोष हा खाऊन पिऊन सुखी असलेल्या पण वैचारिक दृष्ट्या आळशी असलेल्या मध्यम वर्गाकडेच जातो. मध्यम वर्गाच्या ह्या वागणुकीची मीमांसा ह्याची "मनुष्य हा अज्ञाताला जेवढे भीत नाही तेवढे ज्ञाताच्या गमाविण्याला भितो" ह्या कृष्णामुर्तींच्या वाक्याने करता येईल.

    पण इतिहासाकडे पाहिले तर खडतर परिस्थितीमध्ये वाढलेल्या मनुष्यानकडून पण हा शोध घेतला गेल्याचे जाणवेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर उदाहरण होय.किंबहुना सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात मध्यम वर्गाला कमी वयात आणि लायकीपेक्षा जास्त मिळणारा पैसा (ह्यात दुर्दैवाने मी आणि माझे व्यवसाय बंधूच जास्त आहेत) करमणूक, प्रसारमाध्यम आणि भौतिकतेची मोहिनी इतकी प्रचंड आहे की असा शोध खडतर परिस्थितील माणूसच जास्त घेऊ शकेल. जेव्हा त्या गांजलेल्या मनुष्याला एवढी भली मोठी यंत्रणा (system ) आपल्या विरुद्ध दिसते, आणि संघटीत होऊन सुद्धा हिंसेने प्रश्न सुटणार नाही ह्याचे जेवा आकलन होते तेव्हा सर्व गृहितकांना धक्का लागून, नवीन वैचारिक मांडणीची सुरुवात होते. आणि अशीच माणसे रंजल्या गांजल्यांची नेतृत्व करण्यास लायक असतात.

    असो मूळ मुद्द्याकडे येऊन, समारोप करताना, असेच म्हणावे लागेल की मध्यम वर्गीयांच्या वैचारिक आळसातच, मानसिक पारतंत्र्याची आणि राजकारणी व अन्य संघटनांच्या नेत्यांकडूनच त्यांच्या त्यांच्या महापुरुषांच्या होणार्या पराभवाची बीजे दडलेली आहेत.

    - योगेश्वर शुक्ल

    ReplyDelete
  2. योगेश्वर शुक्ल नव्हे संजय सोनवणी
    वाचक मित्रांनो सोनवणी यांचे लिखाण आणि जे. कृष्णमूर्ती यांचे लिखाण याच्यात साम्य आहे, असे म्हणणाèया योगेश्वर शुक्ल नावाच्या माणसाची प्रतिक्रियेला भुलू नका. स्वत: संजय सोनवणी हेच योगेश्वर शुक्ल नावाने प्रतिक्रिया लिहितात अधून मधून. प्रसिद्धी मिळविण्याचा हा एक फंडा आहे.

    ReplyDelete
  3. श्री/श्रीमती अनामिक महाशय,
    ही माझी ब्लॉग वर पहिलीच प्रतिक्रिया आहे. त्या मुळे अधून मधून प्रतिक्रिया देत असतात ह्या आपल्या गृहितकाला काही प्रमाण नाहीये. आपण माझी "profile " बघू शकता. माझे छायाचित्र सुद्धा मी टाकले आहे. आपल्याला अजून काही प्रमाण पाहिजे असल्यास जरूर कळवावे.
    आणि आपण अनामिक राहून "conspiracy theories " ना जन्म देणे हे विसंगत वाटते. कृपया प्रकट व्हा.
    - योगेश्वर शुक्ल

    ReplyDelete
    Replies
    1. Sanjayji,
      hhaa... yogeswar bhagwan ki jay! chalu dya tumache.

      Delete
    2. श्री/श्रीमती अनामिक,
      आपल्या विनोद-बुद्धीची दाद द्यायला हवी. :D
      "झेन बुद्धिझम", कृष्णमूर्ती, एकहार्ट टोले, खलील जिब्रान याच्या चाहत्याला आपण एकदम भगवान करून टाकले.
      आपल्या भावनांचा मी सन्मान करतो :D पण "सर्व-शक्तिमान ईश्वर" ह्या कल्पनेपासून आणि त्यातून उगम पावणाऱ्या धर्मादी संकल्पनांपासून मी चार हात लांब राहणेच पसंत करेन. डार्विन सिद्धांतानुसार मनुष्य हा जीवन उत्क्रांतीमधील एक टप्पा मानून त्याच्या व्यवहाराचा शोध घेणे आणि त्यासाठी बुद्धादी मनुष्यांनी सांगितलेला स्वयं-शोध (self inquiry ) हेच साधन वापरणे माझ्यासाठी श्रेयस्कर.

      नववीत का दहावीत असताना जनार्दन वाघमारेंचा "महापुरुषांचा पराभव" असा एक धडा होता आम्हाला. त्या मध्ये महापुरुषांचा पराभव हा त्यांच्या अनुयायांकडून कसा होतो या बद्दल एक सिद्धांत मांडला होता. तो बरोबर की चूक हे वाचकाने ठरवावे. महापुरुषांबद्दल ठीक आहे ते. पण माझ्या सारख्या "सामान्य मनुष्याला देवत्व प्रदान करून पराभव" ह्या नवीन परंपरेचा उद्गाता आपणास व्हायचे आहे काय ? :D हे सर्व वाचून, वाचकाच्या तोंडातून आपसूकच "हे भगवान !! " असे शब्द नाही आले म्हणजे मिळवल. :P .
      - योगेश्वर शुक्ल

      Delete
  4. @ Anonymous या लेखावर एवढी समर्पक प्रतिक्रिया कुणीच दिली नाही. ह्या ह्या ह्या ह्या एकदम बोगस लेख. तरीही व्वा क्या बात है असे ऐकण्याची सवय लागलेल्या नालायक सोनवणी साठी...
    प्रतिक्रिया भाग-१.

    १."सभोवतालच्या विचारव्युहांनी जेंव्हा आपले स्वत:चे विचार प्रभावित होवू लागतात तेंव्हाच आपण स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हरवून बसलो असतो- जसे कि सोनवणी तू वाघ्याच्या संदर्भात हरवून बसलास."

    २. "मनुष्य स्वत:च्या विचारांसह पुढे जाणार कि अन्यांच्या वैचारिक वादळांबरोबर इतस्तत: भरकटत जाणार हे त्याच्या नैसर्गिक नैतीक धारणांवर अवलंबुन असते."- वाघ्या संदर्भात तुझी पण नैसर्गिक भावना मातीत गेली आणि अन्यांच्या वैचारिक वादळांबरोबर तू भरकटत गेलास.

    ३."व्यक्तिगत धारणा म्हणजे समाज-धारणा नव्हेत तसेच समाजाच्या धारणा म्हणजेच व्यक्तिच्या धारणा नव्हेत."- वाघ्या संदर्भात तुझी जी व्यक्तिगत धारणा आहे तीच तू दुसर्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहेस. गाढवा नशेतून बाहेर ये.

    ४."व्यक्तीचे स्वातंत्र्य हे समाज स्वातंत्र्याएवढेच मुल्यवान असल्याने झूंडीच्या विचारसंकल्पना लादणारे गट हे नेहमीच समाज व व्यक्तीस्वातंत्र्याचे शत्रु असतात."- म्हणून झुंडीने मोर्चे काढायला लावतोस काय रे तू हरामखोरा

    ५. "सामाजिक विचारस्वातंत्र्य हे नेहमीच सर्व व्यक्तिंच्या व्यक्तिगत विचारस्वातंत्र्याचा एकुणातील समुच्चय असतो...तर झुंडीचे स्वातंत्र्य हे परतंत्र प्रवृत्तीच्या पराभुत व्यक्तिंच्या नैराश्याचा एकुणातील आशय असते."- अच्छा ६ ऑगस्ट च्या झुंडी म्हणजे पराभूत मानसिकतेच्या होती वाटते.

    ६."वैचारिक प्रभाव आपसुक निसर्गत: पडणे आणि प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे यात म्हणुनच मुलत: फरक असतो."- निसर्गत: प्रभाव पडणे बंद झाले कि देशी ढोसून प्रभाव पडणे यावर नाही का लिहिले रे गाढवा.(पुढे वाचा...)

    ReplyDelete
  5. प्रतिक्रिया भाग-2.


    ७. "निसर्गत: स्वतंत्र वृत्तीचा मनुष्य आपल्या स्वभावधर्माला अनुकुल अशाच विचारांना स्वीकारत जातो वा नवीन विचारांना विकसीत करत जातो, पण परतंत्र वृत्ती नेहमीच गतानुगतीक होत नेहमीच पुरातनाचा आधार घेत हिंसक मृत-वैचारिक झुंडी बनवण्यात अग्रेसर असतात. अशाच झुंडींनी आजवर मानवी आत्म-विकासाचा स्वतंत्र मार्ग डागाळुन व अवरुद्ध करुन ठेवला आहे."- अरे महामूर्ख आपल्या स्वभावधर्माला अनुकुल असे विचार स्वीकारणे म्हणजे स्वतंत्र्य नव्हे तर ती सोय आहे सोय. जसे कि ओल्ड मोन्क नाही चढली कि देशी ढोसणे.

    ८. "विश्वात काहीही पवित्र नाही कि काहीही अपवित्र नाही, पण अमुकच पवित्र वा अमुकच अपवित्र असे द्वंद्व निर्माण केले जाते तेंव्हा मानवी स्वातंत्र्य संकोचु लागते."- गाढवा तुला तुझे नातेवाईक ओळखत नाहीत आणि चालला विश्वाच्या गप्पा हाणायला.वश्वात काही पवित्र असो अथवा नसो. तू मात्र रोज आंघोळ करत जा बाबा. आंघोळ न करून तू वाघ्या सारखा दिसायला लागलास.

    ९."वैचारिक पारतंत्र्य हवेसे वाटणे वा लादुन घेणे ही मानसिक विकृती आहे...मानवी स्वातंत्र्याच्या मुलभुत नैसर्गिक संकल्पनेशी विरोधाभासी आहे म्हणुनच ती त्याज्ज्य आहे."- अगोदर तू तुझी दारू ढोसायची सवय त्याज्य कर. साला कुणाशी बोलतय हे पण कळत नाही या येड्याला. आज पर्यंत ज्या भटांनी बहुजनांवर वैचारिक पारतंत्र्य लादले त्याचे काय? तू फिल्म इंडस्ट्री सोडून दारूत बुडालास त्याला कोण जबाबदार आहे? फिल्म इंडस्ट्री मधील वैचारिक पारतंत्र्यच ना ?

    १०."परतंत्र वृत्तीचे लोकच परतंत्र झुंडी निर्माण करत असतात.स्वतंत्र मनोवृत्तीचे लोक कधीही झुंड बनवत नसतात."- म्हणून झुंड शाहीच्या माध्यमातून समाजात मराठा विरोधी झुंडी निर्माण करत आहेस काय रे?

    ११."स्वातंत्र्य-पारतंत्र्य हे बाह्य नसते...ते राजकीय, आर्थिक नसते...तर स्वयंप्रेरणाधिष्ठ असते. ते आंतरिक असते. एक वेळ आर्थिक/राजकीय गुलाम जे स्वातंत्र्य भोगु शकतो ते कदाचित मालकांनाही भोगायला मिळत नाही, ते यामुळेच!"- गुलामी कोणतीही असो तिथे स्वातंत्र्य उपभोगण्याची कल्पना करणे म्हणजे दलितांनी गावाबाहेर राहून स्वयंप्रेरणाधिष्ठ स्वातंत्र्य उपभोगावे असे म्हणणे होय. तुझ्या सारखे आर्थिक (दारूच्या व्यसनाने )/ राजकीय गुलाम जे स्वातंत्र्य भोगतात त्यांचे वर्णन तुकोबांनी असे केले आहे-"शुके नळिकेशी I गोविले पाय II विसरोनी जाय I पक्ष दोन्ही II"

    १२." जर कोणी पारतंत्र्यात असेल तर तो परतंत्र लोकांमुळेच...स्वतंत्र मनुष्य कधी कोणाला परतंत्रात नेत नाही किंवा जात नाही. आणि असे स्वतंत्र लोक हेच वैश्विक स्वातंत्र्याचे खरे अधिष्ठाते असतात."- बहुधा तुला दारूची नशा चढली कि स्वतंत्र वाटत असावे असे तुझ्या एकंदरीत लिखाणावरून दिसते. ब्लोगवर थातूर मातुर लिखाण करून स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे म्हणजे शेख चील्लीची स्वप्ने पाहण्यासारखे आहे. त्यात तुझ्या सारख्याला प्रचंड व्यसने मग स्वातंत्र्याचे ३-१३ च वाजणार. म्हणतात ना आधीच मर्कट त्यात दारू प्याला.

    (आता कुणाला माझ्या लिखाणात आणि शेक्सपियरच्या लिखाणात साम्य वाटू नये म्हणजे झाले. ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या..........)

    ReplyDelete
  6. Dear Sonawani,
    I hope this will be fun for you to read
    http://www.aisiakshare.com/node/1125

    ReplyDelete
  7. Bhannat vidambal. Khup awadale. Khavchatkhan rocks sometimes!

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...