Monday, April 14, 2014

तुम्हाला काय वाटते?

निवडणूक आयोगाच्या मतमोजणी घोषणा प्रक्रियेमुळे ग्रामीण भागात एक मोठा अकारणचा तणाव निर्माण होतो आहे. कोणत्या पोलिंग स्टेशनवर कोणत्या पक्षाला/उमेदवाराला किती मते मिळालीत हे समजायची पद्धत सध्या असल्याने निवडून आलेला व हरलेलाही उमेदवार ज्या प्रभागातुन मते कमी मिळालीत त्यावर डुख धरतो. विकासकामे जाणून-बुजून केली जात नाहीत, शेतीचे पाणी तोडणे ते पतसंस्थांच्या वसुलीचे झेंगट मागे लावून देणे असे प्रकार घडत असल्याचे मला ग्रामीण भागातील अनेक मतदारांनी सांगितले आहे. यामुळे निर्माण होणारे तणाव अनेकदा हिंसक पातळीपर्यंतही जात असल्याने यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.


निवडणूक आयोगाने कोणत्या प्रभागातुन कोणाला किती मतदान झाले हे घोषित करण्याऐवजी एकुणातीलच निकाल घोषित केला तर चांगले होईल असे वाटते. मतदान हे सर्वस्वी गुप्तच रहायला हवे.

अगदी माहितीच्या अधिकारातही कोणत्या प्रभागात कोणाला किती मतदान झाले याची माहिती दिली जावू नये.

तुम्हाला काय वाटते?

8 comments:

  1. संजय सर ,
    पुण्यात काही ब्राह्मणांनी त्यांच्यासाठी वेगळी रांग हवी अशी मागणी केली आहे ,
    आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो !

    ReplyDelete
  2. आमच्या इथे संध्या स्नान करण्यासाठी काही ब्राह्मण मंडळीनी निवडणूक आयोगासाठी काम करत असताना त्यांनी वेगळी सुट्टी मागितली आहे , कारण त्याना असे समजले की मुसलमान लोकाना नमाज पढायला निवडणूक आयोगाने अर्धा तास दुपारी स्पेशल सुट्टी दिली आहे

    ReplyDelete
  3. आमच्या इथेतर निवडणूक आयोगाच्या शाईमध्ये डुकराची चरबी असते अशी अफवा उठल्यामुळे
    मुसलमान बांधावात अस्वस्थता पसरली आहे आणि त्यामागे नरेंद्र मोडी यांचा हात आहे असे समजले जात आहे
    आणि कोल्हापुरात काही स्त्रिया मासिक पाळीमुळे अपवित्र असताना त्यांनी लोकांच्या बोटाना शाई लावली म्हणून ब्राह्मण लोकांनी निषेधाची सभा घेतली आहे असे समजते

    पुण्यात रांगेत एका महाराची सावली एका ब्राह्मणाच्या अंगावर पडली त्यामुळे त्याने तिथेच त्याला मरे पर्यंत मारले पण तो मेला नाही उलट अति हाडकुळा ब्राह्मण बेशुद्ध पडला असे समजते .

    एका कुल्फी वाल्याने आप[आपली गाडी सावलीत लावून नंतर मतदान केले आणि परत आल्यावर निवडणूक आयोगाने त्यास अटक केली कारण तो लोकाना कुल्फी वाटत होता असे त्याना वाटले

    पोस्टमन शाळेच्या प्रांगणात घुसले आणि त्यांनी शाळेचे टपाल दिले पण निवडणूक आयोगाने ते जप्त केले त्यात कुमारी खोब्रागडे यांची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाल्याचे पत्र गहाळ झाले
    यास जबाबदार निवडणूक आयोग आहे का पोस्टमन ?

    ReplyDelete
  4. संजय सर ,

    अहमदनगर येथे सीसी टीव्ही मुले मतदान कोणी कोणाला केले ते संपूर्णपणे सत्ताधारी पक्षाला समजले आहे , त्यामुळे एकच हाहाःकार माजला आहे ,
    अनेक शेतकरी लोकांनी आत्महत्या केल्यावर सुद्धा रेकोर्ड प्रमाणे मतदान केल्याचे दिसते त्यामुळे तो आश्चर्याचा आणि संशयाचा विषय झाला आहे
    बारामतीत शाई पुसून देण्याचे ५० रुपये घेतले जातात आणि मतदान करण्याचे ५०००रु घेतले जातात
    असे ताज्या वृत्तात म्हटले आहे !
    माननीय शरद रावांनी पंजाच्या दाही बोटाना शाई लावलेली सर्वाना दाखवून आश्चर्याचा सर्वाना धक्का दिला तसेच माननीय पुतणे आणि श्री पांढरे हे समोरासमोर आल्यावर काय झाले ते आम्हाला समजले आहे पण झालेली शब्दाशब्दी निवडणूक आयोगाच्या आचार संहिते प्रमाणे सांगण्याच्या योग्यतेची नाही !आणि लिहिण्याच्या तर त्याहूनही नाही !

    ReplyDelete
  5. अनेक जणांनी वेगवेगळे अनुभव सांगितले ते वाचून बरेच शिकायला मिळाले !
    बहुतेक सर्व गोष्टी गप्पा या सदरात मोडणाऱ्या वाटतात ,
    कदाचित सरांनी " तुम्हाला काय वाटते ? " असे विचारले म्हणून या सर्वांनी काहीतरी लिहिले असावे !

    ReplyDelete
  6. आप्पा - यशवंतराव असताना बेरजेचे राजकारण हा शब्द प्रसिद्ध झाला होता !
    बाप्पा - आता सूडाचे राजकारण हा शब्द त्याची जागा घेतो आहे !
    आप्पा - गेल्या ५५ वर्षात इतका फरक पडला आहे असे समजायचे का माणसे बदलली असे समजायचे का समाज बदलला ?
    बाप्पा - एकीकडे मतदानाची गुप्तता आणि स्वातंत्र्य , लोकशाही याच्या गप्पा मारत आपण तत्वज्ञांनी विश्वात वावरत जगातील सर्वात मोठी लोकशाही असे म्हणत असतो , आणि एकीकडे अशा प्रकारची गुप्त माहिती जर सर्वाना खुली होत असेल आणि त्याचा परिणाम सूडबुद्धीने इतराना छळण्यात होत असेल तर या लोकशाहीचे काय होणार ?
    आप्पा - एकीकडे आपली लोकशाही किती प्रगल्भ आहे याची चर्चा करायची आणि दुसरीकडे अशा मतदानाचे रेकोर्ड अभ्यासून जनतेला दावणीला बांधायचे हे फारच क्लेशकारक आहे !
    बाप्पा - संजय सर जेंव्हा असे मतप्रदर्शन करतात त्यालेळेस त्यावर संशय घेणे चुकीचे ठरेल कारण त्यांच्या अभ्यासाबाबत शंका घेणे अशक्य आहे !

    ReplyDelete
  7. संजय सरांनी फारच महत्वाच्या विषयाला योग्य वेळी हात घातला आहे
    तसे पाहिले तर थोडा उशीरच झाला आहे ,
    मुख्यता जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोग यांच्या दिमतीला कोण असते ते जर पाहिले तर असे दिसते की पोलिस फौजफाटा आणि इतर सरकारी नोकर यांच्या मदतीने हे मतदानाचे कार्य संपन्न होत असते
    संजय सरांनी सामान्य वाचकाना समजावे म्हणून मतदानाची संपूर्ण दिली तर सर्वाना हे समजायला सोपे होईल !सरकारी आणि निम सरकारी नोकरवर्ग आणि शाळा शिक्षिका आणि शिक्षक हे तर या प्रकरणात फारच त्रास सहन करतात , ते काही बांधील नसतात पण साधारणपणे त्यांच्या कडून खूपच काम करवून घेतले जाते शिक्षक हा आपोआप बळीचा बकरा बनत जातो !
    आजकाल स्वतहाच स्वताचे काम करून स्वतंत्र बुद्धीने उपजीविका करणारा एक वर्ग तयार झाला आहे त्याना अशा ठिकाणी विश्वासाचे काम करायला सरकार विचारू शकते , पण तिजोरीवर फार भार पडू न देता , असि कामे उरकली जातात त्यावेळेस सरकारी यंत्रणांचा खिळखिळीतपणा उघड होत जातो !
    ग्रामीण भागात तर या सर्वाचां वाली कुणी नसतो उन्हातान्हात आणि पावसात याना राबवून घेतले जाते आणि हि कामे अत्यावश्यक धरली जातात आणि स्त्रिया आणि सिनियर लोकांची पिळवणूक होते !खुद्द निवडणूक आयोग आणि त्यांचा नोकरवर्ग यांची आकडेवारी प्रसिद्ध झाली तर अजून चित्र स्पष्ट होईल !

    ReplyDelete
  8. जुन्या काळात गाय वासरू हे एका पक्षाचे चिन्ह होते. त्यात गायीच्या बरोब्बर पेकाटावरच (पायावरच )सर्व मतदारांनी शिक्के मारल्याची घटना ऐकिवात आहे. गुप्त मतदान जरी असले तरी या यंत्रणेचा ताबा घेऊन प्रबळ पक्ष दुरुपयोग करू शकतात . त्यामुळे मतदान केंद्रवार माहिती जाहीर होणे गरजेचे आहे. किमान त्या त्या पक्षांना आपल्या कामाचा आरसा बघता येतो. भविष्यात गुप्त मतदान थांबवून उघड मतदानाची पद्धत रुजवायला हवी म्हणजे खरी लोकशाही आपण प्रस्थापित केली असे समजता येईल .

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...