Thursday, October 2, 2014

सृष्टीजन्माचा महन्मंगल उत्सव

दसरा हा सृष्टीजन्माचा महन्मंगल उत्सव आहे.

आदिमाया नऊ दिवस (नऊ महिन्यांचे प्रतीक) सृष्टीचा गर्भ धारण करते आणि दहाव्या दिवशी सृष्टीला जन्म देते अशी ही वरकरणी साधी पण पुरातन मानवाच्या कल्पनेची मोहक झेप.

या सणाचा रावणवधाशी काहीही संबंध नाही. उलट हे मित्थक जोडुन सणाचा पवित्र-मंगल मुलार्थ मात्र घालवुन टाकला गेला आहे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. दस-याला रावणवध झाला असता आणि तोच या उत्सवाचा हेतू असता तर आधीच्या नवरात्रींचे प्रयोजनच रहात नाही हे सांस्कृतीक भेसळ करणा-यांच्या लक्षात आलेले दिसत नाही. त्यामुळे रावण-दहन वगैरे अपप्रकार करणे सांस्कृतीक मुढतेचे लक्षण आहे.

सर्व जगात विश्वाचा जन्मोत्सव असलेला हा एकमात्र सण...सृजनाचे माहात्म्य ठसवण्याऐवजी त्या महन्मंगलतेला हिंसक घटनेची पाचर ठोकणारे सांस्कृतीक विकृत नक्कीच निषेधाला पात्र आहेत.

पुर्वी पावसाळा संपला कि लष्करी मोहिमा सुरु होत. पावसाळ्यात सहसा युद्धे केली नसत. शेतकरी हेच बव्हंशी सैनिकही असल्याने पानकळ्यात त्यांना शेतीकडे लक्ष देणे भाग होते. हंगाम संपला कि मोहिमांत सामील होण्याचे आदेश येत. सीमोल्लंघन हा त्याचाच एक प्रतिकात्मक भाग या सृष्टीजन्माच्या सोहोळ्याशीही नंतर जोडला गेला आहे.

माझ्या सर्व मित्रांना सृष्टीजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! आंणि खरे तर हा दिवस मातृदिनच आहे. स्त्री सामर्थ्याचे प्रतीक आहे. यच्चयावत विश्वातील सर्व मातांना विनम्र अभिवादन!

4 comments:

  1. रावण हा पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये यांच्या सहजप्रेरणांची पूर्ति करणे हे मानवाचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि त्यातच सुखाचे वर्धन व दुःखाचा निरास शक्य आहे असे मानणाऱ्या संस्कृतीचा पाईक होता तर राम हा मन हेच बंधन किवा मुक्तीला व पर्यायाने सुखाचे वर्धन व दुःखाचा निरास असे मानणाऱ्या संस्कृतीचा पाईक होता. हा दोन संस्कृतींमधील झगडा होता. दोन जमातीमधील नव्हे. वेदात वर्णन केलेले दाशराज्ञ युद्ध याच प्रकारचे होते. वेद वाचण्यासाठी आवश्यक असलेली मनाची निर्विकारता सहजसाध्य नसल्याने अशा लोकांसाठी रामायण लिहिले गेले असावे

    ReplyDelete
  2. रावण हा रामायण काळातील लंकेचा राजा होता. अनुराधापूर ही रावणाची राजधानी होती. त्याला दशानन म्हणून ही ओळखतात. त्याला दहा तोंडे नव्हती की वीस हात नव्हते. तो शरीराने सर्वसामान्य होता. ’रावण’ हे नाव त्याला शंकराने दिले. अनेकांनी त्याला आपल्या परीने श्रेष्ठ खलनायक म्हणून रेखाटण्याचा फार प्रयत्न केला. विश्वातले सर्व दुर्गण त्यात एकवटण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खरे पाहता रावणाने रामाहून अधिक व श्रेष्ठ विद्या प्राप्त केली होती. तो कला, शास्त्र , विद्या, बल यांत रामाहून वरचढ होता. रावणाला चारही वेद आणि सहा उपनिषदे याचे संपूर्ण ज्ञान होते. तो उत्तम आयुर्वेदाचार्य होता. वडील विश्रवा ब्रम्हकुळातले तर माता कैकसी ही उच्च, दानव कुळातील होती.

    ReplyDelete
  3. दशहरा या विजया दशमी यूं तो रावण के वध पर मनाया जाने वाला उत्सव है, लेकिन भारत के कई स्थान ऐेसे भी है जहां रावण दहन नहीं किया जाता है, बल्कि उसकी पूजा अर्चना की जाती है। इनमें से कुछ जगहें तो ऐसी हैं जहां के निवासी रावण को अपना रिश्तेदार भी मानते हैं और इसलिए वे रावण का दहन नहीं बल्कि पूजा करते हैं। कुछ जगहों पर रावण के पांडित्य के कारण भी उसे पूजा जाता है। आइए जानते हैं कुछ ऐसी ही जगहों के बारे में जहां रावण की पूजा होती है या उस स्थान से जुड़े लोग रावण का रिश्ता वहां से जुड़े होने की किवदंतियां सुनाते हैं....

    - उत्तरप्रदेश में गौतमबुद्ध नगर जिले के बिसरख गांव में भी रावण का मंदिर निर्माणाधीन है। मान्यता है कि गाजियाबाद शहर से करीब 15 किलोमीटर दूर गांव बिसरख रावण का ननिहाल था। नोएडा के शासकीय गजट में रावण के पैतृक गांव बिसरख के साक्ष्य मौजूद नजर आते हैं। इस गांव का नाम पहले विश्वेशरा था, जो रावण के पिता विश्रवा के नाम पर पड़ा। कालांतर में इसे बिसरख कहा जाने लगा।

    - जोधपुर शहर में भी लंकाधिपति रावण का मंदिर है। यहां के दवे, गोधा और श्रीमाली समाज के लोग रावण की पूजा-अर्चना करते हैं। ये लोग मानते हैं कि जोधपुर रावण का ससुराल था तो कुछ मानते हैं कि रावण के वध के बाद रावण के वंशज यहां आकर बस गए थे। ये लोग खुद को रावण का वंशज मानते हैं।

    ReplyDelete
  4. आपण आता पर्यंत रामा बद्दल वाचताना रावण हा एक अतिदृष्ट राजा असल्याचं रंगवुन सांगण्यात आलं किंवा विष्णुच्या अवताराला प्रमोट करण्याच्या उद्देशाने रावणावर चिखलफेक केली गेली।

    पण रावण एक महान राजा होता व त्यावर हिंदु लेखकानी सतत शिंतोळेच उडविले नाही तर स्त्री ला पळ्वुन नेणारा एक राक्षसांचा राजा म्हणुन अत्यंत हिन दर्जाच साहित्य हजारो वर्षे भारतात वाचलं व लिहलं गेलं।

    पण आता मात्र वेळ आली आहे मुळ रावणाला जाणून घेण्याची। रामायणाच्या बाहेर पडुन रावणाची दुसरी बाजु समजावुन घेण्याची।

    रावण बहुगूणी राजा होता। तो एक ज्ञानी व शुर विर मुलनिवासी होता। रावणाला वेदिक लोकानी नुसतं बदनाम करुन ठेवलय।
    पण आज मुलनिवासी लोकं शिकुन पुढे येऊ लागले। ब-याच गोष्टी तर्कावर तपासुन बघु लागेले, व ज्या गोष्टी थोतांड आहेत असे वाटते त्यावर संशोधन करुन नविन, सुधारित व खरा ईतिहास दाखविणारं साहित्य आपल्या पुढं ठेऊ लागलेत।

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...